पुणे : गेली कित्येक दशके महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशसारख्या राज्यात अखंड महाराष्ट्रासह देशाचे ऊर्जास्रोत असलेल्या शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विकली जात आहे. या बिडीच्या पॅकेटवर महाराजांचे फोटो देखील होता. बिडीच्या उद्योजकांविरोधात याआधी देखील शिवभक्तांकडून आवाज उठवला जात होता. यानंतर अचानक होणारे नुकसान टाळण्यासाठी फोटो व नाव काही काळाने बदलण्याचे आश्वासन या ग्रुप कडून देण्यात आले होते. मात्र तरीही या बिडीचे उत्पादन व विक्री ‘संभाजी बिडी’ या नावाने सुरूच राहिले.
आता, गेले २ दिवस हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून शिवभक्तांनी आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली यासह अनेक राजकीय नेत्यांनी देखील समाजमाध्यमातून या विरोधात आवाज उठवला. अखेर संभाजी महाराजांच्या नावाने व्यसनी पदार्थ विकणे उद्योजकांना भोवले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक साबळे-वाघिरे ग्रुपवर गुन्हा दाखल करण्यात आला असून महापुरुषांचा अवमान केल्याची तक्रार शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेने केली आहे. पुण्यातील सासवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी काल रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनतेचा रोष या प्रकरणी वाढत असून गेली कित्येक वर्षे या नावाने हे उत्पादन सुरु असून यावर बंदी आणण्यासाठी राजकारण्यांनी पुढाकार का नाही घेतला असा सवाल आता निर्माण होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रात अशी घटना निषेधार्ह असून या बिडीच्या उत्पादनावर लवकरात लवकर बंदी यावी अशी मागणी केली जात आहे. उद्योजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुढील कारवाई काय होणार हे देखील महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताना पाठिंबा देणे हीसुद्धा बेईमानीच”
रियाची रवानगी भायखळा जेलमध्ये होणार
‘ना डरूंगी, ना झुकूँगी’ – कंगना रणौत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

