Share

स्मृती इराणी यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार स्वीकारण्यास कलाकारांचा नकार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- राजधानीत गुरूवारी होऊ घातलेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा कलाकारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वादात सापडला आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्यात काही विजेत्यांना राष्ट्रपतींच्याऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाला विजेत्या कलाकारांनी विरोध केला आहे. आम्ही राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार स्वीकारू, अन्यथा सोहळ्यावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. पण यावर अनेक कलाकारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं नाही, तर सोहळ्यावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा पुरस्कार विजेत्यांनी घेतला आहे. हे प्रकरण चिघळायला लागल्यानंतर स्वत: स्मृती इराणी त्याठिकाणी आल्या होत्या. त्यांना संबंधित कलाकारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात राष्ट्रपती कार्यालयाकडूनच बदल करण्यात आले, असा दावा इराणी यांनी केला. मात्र, तुमच्या भावना मी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवेन, असे आश्वासन त्यावेळी इराणी यांनी दिले होते.थोड्याच वेळात यासंबंधी दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!