Share

सरकारी गोदाम फोडून; सव्वा लाखांचे बियाणे लंपास!

Published On: 

उस्मानाबाद: संचारबंदीच्या काळात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. शासकीय गोदाम फोडून चोरट्यांनी सव्वा लाख रुपये किंंमतीचे बियाणे लंपास केले. ही घटना उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरीच्या वाढत्या घटनेमुळे शेतकऱ्यासह नागरिकात भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ढोकी येथे बियाणाचे शासकीय गोदाम आहे. सोमवारी रात्री गोदामाच्या परिसरात सामसूम असल्याची संधी साधून चोरट्यांनी गोदामाचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. तेथील हरभरा बीज प्रक्रीया केलेल्या ‘जॅकी’ या वाणाची ३२ पोती बियाणे चोरट्यांनी लंपास केले. त्याची किंमत १ लाख २५ हजार रुपये आहे.

ही घटना सोमवारी रात्री १ ते ३ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी बीज प्रक्रीया केंद्र अभियंता पंडीत विश्वनाथ जाधव यांनी मंगळवारी ढोकी पोलीस ठाण्यात धाव घेवून याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूध्द भा.दं.सं. कलम ४६१, ३८० अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रक्ररणात चौकशी करून आरोपींवरती लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!