पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीमुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. निवडणुकी संपल्यापासून शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्य़ेचा विस्फोट होत असून मृतांची संख्याही वाढत आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. याचदरम्यान धक्कादायक म्हणजे पंढरपुर पोटनिवडणुकीसाठी काम करणाऱ्या एका शिक्षकासह त्याचा कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पंढरपूर निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील घेर्डी येथील प्रमोद माने हे शिक्षक मतदानाच्या ड्युटीला होते. येथून परत गेल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील व मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. प्रमोद यांचेवर सांगोला येथे सुरुवातीला उपचार करण्यात आले. मात्र तब्येत खालावल्याने त्यांच्या डॉक्टर भावाने त्यांना मुंबई येथे हलवले. मात्र सर्व प्रयत्न करूनही प्रमोद माने यांचे निधन झाले.
यानंतर त्यांचे वडील वसंतराव, आई शशिकला व मावशी जया यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची पत्नी व मुलगा याने कोरोनावर मात केली असली तरी या निवडणुकीमुळे केवळ शासकीय ड्युटी करणाऱ्या प्रमोद माने यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे.
माध्यमिक शिक्षक असणाऱ्या वसंतराव माने यांनी घेरडीसारख्या अति ग्रामीण भागात राहूनही आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. सर्वांत थोरला प्रमोद हा प्राथमिक शिक्षक होता. प्रशांत माने हा मधला मुलगा पालघर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात अधीक्षक अभियंता आहे. तर प्रवीण हा डॉक्टर असून त्याची पत्नीही डॉक्टर आहे. प्राथमिक शिक्षक असणारे प्रमोद माने हे उत्तम गायक व वादक होते. शिवाय उत्तम वक्ताही होते.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम एक महिना घेण्यात आला. यामध्ये कोरोना नियमांचे निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारचे पालन होताना दिसले नाही. 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा दोन्ही तालुक्यात कोरोनाचा आलेख चढता राहिला आहे. त्यातूनच दोन्ही तालुक्यातील कोरोनाच्या मृत्यूचा तांडव पाहण्यास मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : आंदोलनाची भूमिका आश्चर्यकारक असून, हे केवळ राजकारण सुरू आहे – चव्हाण
- काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणारे हेमंत बिस्वा शर्मा होणार आसामचे नवे मुख्यमंत्री
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
- भाजपच्या आमदार आणि शिवसेनेच्या महिला नेत्यांची कोविड सेंटरवर धक्काबुक्की
- ‘कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याऐवजी २० हजार कोटींचा ‘सेंट्रल व्हिस्टा’ हवा कशाला ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

