Share

धाव घेताना फलंदाज पडल्यानंतर गोलंदाजाने केले असे काही, चाहत्यांचे जिंकले मन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रिकेटमध्ये अनेकदा खेळाडू खेळताना पडतात त्यांना जखम होते. यावेळी अनेकदा प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू अस्थेवाईकपणे जखमी खेळाडूची विचारपुस करतात. अशीच एक घटना इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विटालीटी टी-२० ब्लास्ट स्पर्धेत बघायला मिळाली.

विटालीटी टी-२० ब्लास्ट या स्पर्धेत यॉर्कशायर आणि लँकशायर संघात सामना सुरु होता. दुसऱ्या डावात लॅकशायर संघाला १२९ धावांचे लक्ष्य देण्याात आले होते. यादरम्यान लॅकशायरला १८ चेंडुत १५ धावांची गरज होती. यावेळी स्टीव्हन क्रॉफ्ट आणि ल्युक वेस्ल हे दोन फलंदाजी करत होते. यावेळी वेल्सने जवळच एख चेंडु मारला आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजुला उभ्या असलेला क्रॉफ्टही धाव काढण्यासाठी धावु लागला. मात्र अचानक त्याचे संतुलन बीघडले आणि तो मध्येच खाली पडला.

यावेळी यॉर्कशायर संघाने खिलाडूवृत्ती दाखवत त्याला धावबाद न करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम असा की यॉर्कशायर संघाला हा सामना गमवावा लागला. सामना संपला तेव्हा कॉफ्ट २६ धावांवर नाबाद राहिला. खिलाडूवृत्ती दाखवणाऱ्या यॉर्कशायरचा ४ गड्यांनी पराभव झाला. मात्र त्यांनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीमुळे त्यांनी चाहत्यांचे मन जिकंले. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!