Share

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जारी केलेले दोन्ही क्रमांक बंद, औरंगाबाद पालिकेच्या अजब उपाययोजना!

Published On: 

औरंगाबाद : पावसाळ्यात शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात. अनेक ठिकाणी नाल्यांंवरील अतिक्रमण, साफसफाई अभावी अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. आत्तापर्यंत अनेकांच्या जीवावरही बेतले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेच्या वतीने आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले होते. याकील संपर्कासाठी देण्यात आलेल्या दोन्ही फोन क्रमांकांवर संपर्क होतो, मात्र समोरून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. मागील दिड महिन्यांपासून या मदत केंद्राचा संपर्क क्रमांक बंद आहे. परिणामी, नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे पालिकेची हि योजना देखील कागदोपत्रीच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

पालिकेच्या टाउन हॉल परिसरातील मुख्य प्रशासकीय कार्यालयात नैसर्गिक आपत्ती विषयक तक्रारींसाठी, तसेच तात्काळ मदत कार्यासाठी पावसाळी नियंत्रण कक्ष सुरु केलेला आहे. ०२४०३३३५३६, ०२४०३३३५४० हे दोन्ही संपर्क क्रमांक यासाठी पालिकेने जारी केले आहेत. मात्र या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता दोन्ही क्रमांक लागत नाही. कर्मचार्‍यांनी सांगितल्यानुसार प्रशासकांच्या दालनासह पालिका मुख्यालयातील सगळे लँडलाइन संपर्क सध्या बंद आहे.

दलालवाडी येथे रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम करतांना बीएसएनएलचे कनेक्शनच्या वायर तुटल्यामुळे फोन बंद झाले असल्याचे कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. संपर्क क्रमांकच बंद असल्यामुळे नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी थेट पालिका मुख्यालयातच जावे लागत आहे. त्या ठिकाणी गेल्यावरच मदत कक्षात बसलेले कर्मचारी संबधीत अधिकार्‍यांना मोबाइलवर फोन करतात, अशी अनोखी पद्धत सध्या पालिकेत सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!