मुंबई : राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा आणि दरडग्रस्त भागाचा राजकीय नेते मंडळी दौरे करत आहेत. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज तळीयेमध्ये येऊन दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. तसेच अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. या दौऱ्यादरम्यान नागरिकांना मदतीचे आश्वासन आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.
नारायण राणे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यात मागील दोन वर्षांपासून सतत संकट येत आहेत असा प्रश्न करण्यात आला होता. यावर राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर जहरी टीका केली. . राज्यात पूरस्थिती आली आहे. त्यानंतर चार दिवसाने मुख्यमंत्री चिपळूणमध्ये आले. हे कसले मुख्यमंत्री आहेत. मी तर म्हणतो राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही, असा हल्ला चढवतानाच राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका. आम्ही वेटिंगवरच आहोत, असा उपरोधिक टोला नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
तुम्ही मदत मागायच्या आधीच मोदींनी पाठवली आहे. बाकीची मदत आम्ही मिळवून देऊ. कोणी मागायची गरज नाही. केंद्र कोणतीही मदत बाकी ठेवत नाही. केंद्र सर्व मदत देते, असं सांगतानाच केंद्रालाच सारखी सारखी मदत मागायची असेल तर राज्य कशाला आहे. देऊन टाका राज्य केंद्राला चालवायला. इथे आम्ही वेटिंगवर बसलोय, असं देवेंद्र फडणवीसांकडे पाहून मिश्किल हसत राणे म्हणाले. यावेळी एकच खसखस पिकली.
दरम्यान, पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याठिकाणी पोहचले आहेत. यावेळी ठाकरेंनी चिपळूनच्या जनतेशी संवाद साधत बाजारपेठेची पाहणी केली. दरम्यान स्थानिकांनी ‘आम्हाला मदत करा’ असा आक्रोश मुख्यमंत्र्यासमोर केला.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे शहरात आज नव्याने २५० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- अन् अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहून खा. नवनीत राणांना अश्रू अनावर, पाहा हा व्हिडिओ..
- ‘तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी’, मुख्यमंत्र्यांचा नुकसानग्रस्तांना विश्वास
- चिपळूणच्या नुकसानग्रस्त नागरिकांचा मुख्यमंत्र्यांसमोरच संताप, पाहा व्हिडिओ..
- ‘महाविकास आघाडी सरकारला आताच डिस्चार्ज मिळाला आहे’, नारायण राणेंचा टोला


