Share

प्रियकरासोबत राहत असलेल्या महिलेला सासरच्यांकडून मारहाण

Published On: 

औरंंगाबाद : प्रियकरासोबत राहत असलेल्या तक्रारदार महिलेस चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना २२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोगेश्वरी येथे घडली. प्रियकरासोबत राहू नको असा दम देखील आरोपींनी तक्रारदार महिलेला भरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे लग्न काहीवर्षांपुर्वी झाले होते. तिचे आणि तिच्या सासरच्या मंडळींचे जमत नसल्याने ती तिचा प्रियकर अर्जुन देवीसिंग राजपूत याच्या सोबत जोगेश्वरी भागात राहू लागली. हि माहिती सासरच्या मंडळीना कळताच त्यांनी जोगेश्वरीत तक्रारदार महिलेचे घर गाठले.

दरम्यान, तक्रारदार महिलेला पुन्हा त्यांच्या घरी परत नेण्यासाठी समजून सांगत असतांना तिला आणि तिच्या प्रियकराला बेदम मारहाण सासरच्या मंडळीनी केली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून भारत बनकर (रा.जोगेश्वरी), सचिन खंडाळे (रा.बदनापुर) यांच्यासह दोन महिलांविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!