Share

गौरी लंकेश यांचे मारेकरी सापडतात, दाभोळकर-पानसरेंचे का नाही? : हायकोर्ट

Published On: 

मुंबई :  गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कर्नाटक पोलीस महाराष्ट्रातून येऊन अटक करुन घेऊन जातात आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांबद्दल आमच्या तपास यंत्रणांना काहीच कसं कळत नाही? याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. या शब्दांत हायकोर्टाने तपासयंत्रणेच्या नाकर्तेपणावर ताशेरे ओढले आहेत.  दरवेळेस आमच्या समोर काहीतरी तपास अहवाल सादर केले जातात पण त्यातून काही निष्पन्न होत नाही अशी नाराजीही हायकोर्टाने यावेळी व्यक्त केली आहे.

दाभोलकर – पानसरे यांच्या हत्या प्रकरणांत मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय आणि राज्य सरकार दोघांनाही चांगलंच सुनावलं . सीबीआय आणि एसआयटीनं दाखल केलेल्या सीलबंद अहवालांवर तीव्र नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने दाभोळकर प्रकरणात सीबीआयचे दिल्लीतील सहसंचालक आणि पानसरे प्रकरणात महाराष्ट्राचे गृहसचिव यांना पुढील सुनावणीवेळी कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे १२ जुलैला पुढची सुनावणी होणार आहे.

नेमकं काय म्हटलं हायकोर्टाने
दक्षिणेतील विचारवंत गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कर्नाटक पोलीस महाराष्ट्रातून येऊन अटक करुन घेऊन जातात आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांबद्दल आमच्या तपास यंत्रणांना काहीच कसं कळत नाही? याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. दरवेळेस आमच्या समोर काहीतरी तपास अहवाल सादर केले जातात पण त्यातून काही निष्पन्न होत नाही.महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा घटना घडतात आणि त्याच्या तपासात काही निष्पन्न होत नाही हे या पुरोगामी राज्याला शोभणारं नाही या अहवालांवरुन तपास करणाऱ्या यंत्रणांमध्ये आपापसांत कोणताही समन्वय नाही हे स्पष्ट होतंय .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!