टीम महाराष्ट्र देशा : सामान्य नागरिकांना महापालिकेची काही हजारांची पाणी बिले थकवल्यास त्यांना दंड केला जातो, अनेकदा नळ कनेक्शन देखील कापले जाते. यामध्ये राज्याचे प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचेच बिल थकल्यावर अधिकारी देखील काय करणार. मात्र मुंबई महापालिकेने लाखोंची नळपट्टी थकल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंगला ‘वर्षा’ डिफॉल्टर म्हणून घोषित केला आहे.
जवळपास ७ लाखांचे पाणी बिल थकवल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंगला मुंबई मनपाने डिफॉल्टर यादीत टाकला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पाण्याच्या बिलाची ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांची थकबाकी आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवासासह डझनभर मंत्र्यांच्याही घरांची पाण्याची ८ कोटींची थकबाकी थकलेली आहे त्यामुळे त्यांच्याविषयी मनपा नेमकी काय भूमिका घेते हे पाहण महत्वाचं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
