Share

पोलिसांचे दोन दिवसाचे वेतन कपात करण्यात येऊ नये, पोलिस बॉईज संघटनेची मागणी

Published On: 

औरंगाबाद : पोलीस अमलदारांचे दोन दिवसाचे वेतन कपात करण्यात येऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांना पोलीस बॉईज संघटनेचे मंगळवार (ता.११) रोजी निवेदन देण्यात आले आहे.

रात्र दिवस नौकरी करून सुद्धा पोलीसांना जास्तीचा भत्ता दिला नाही. पोलिसांचे पगार कापू नये, कपातीसाठी महाराष्ट्र सरकारचे इतरही कर्मचारी आहे. प्रत्येक पोलीस हा रोडवर नोकरी करत आहे, इतर महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी जे घरी बसून पगार खाताय. पोलिसांचे दोन दिवसाचे पगार कापण्याची गरज नाही जे लोक घरी राहून पगार खात आहे, त्यांचा अर्धा पगार कापायला हरकत नाही. कोरोना महामारीच्या काळात सर्व पोलीस, आरोग्य खाते, साफसफाई कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहे.

इतर खात्याचे कर्मचारी हे कमी उपस्थितीत किंवा घरी बसून काम करीत आहेत. त्यांचा पगार कापण्यात यावा ही विनंती करण्यात आली. आमचे कुटुंब हे अहोरात्र धोक्याच्या वातावरणात आहे कारण पोलीस कुटुंबियांना नोकरी करणाऱ्या व्यतिरिक्त घरातील इतर सदस्यांना लस न दिल्यामुळे जीवितास धोका पत्करून निरंतर नोकरी करत आहेत. आमदार निवासाच्या बांधकामाचा निधी व इतर खास लोकांना सुविधा देण्यात येणारा वापरण्यात येणार निधी हा सहायता निधी म्हणून वापरला तर पोलिसांचा पगार कपात करण्याची वेळ येणार नाही. पोलीस अमलदारांचे दोन दिवसांचे वेतन कपात करण्यात येऊ नये अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!