Share

पंढरपूर-मंगळवेढ्याचे नवनिर्वाचित आमदार समाधान अवताडेंनी घेतली आमदारकीची शपथ

Published On: 

मुंबई – अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येऊन या निवडणुकीसाठी जोर लावला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यावर भाजपने झेंडा फडकावल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.

या निवडणुकीत समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा ३ हजार ५०३ मतांनी पराभव केला. या विजयानंतर आवताडे यांनी आज मुंबईत जाऊन आपल्या आमदारकीची शपथ घेतली. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आवताडेंना गोपनियतेची शपथ दिली. यावेळी, भाजप आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्यासह भाजपा नेते उपस्थित होते.

कोरोना महामारीमुळे सध्या मोठ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच, यापूर्वीचं अधिवेशनही ठराविक काळापूरतंच घेण्यात आलं होतं. त्यामुळे, समाधान आवताडे यांचा शपथविधी सोहळाही मोजक्यात लोकांमध्ये घेण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!