मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून आता जिल्हा पातळीवर पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
राज्यात काल नव्या कोरोना बाधितांचा आकडा ४० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या एकूण रुग्ण संख्येत काहीशी घट पाहायला मिळत असली तरी धोका अजून कायम आहे. तर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी लॉकडाऊनबाबत भाष्य करताना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याबाबत वा काही सूट देण्याबाबत चर्चा करून एकमताने निर्णय होण्याची शक्यता असल्याचं भाष्य केलं होतं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सध्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. या बैठकीकडे राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं असून लॉकडाऊन बाबत काय निर्णय होणार हे महत्वाचं ठरणार आहे. कारण, याआधी १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. तर, काही जिल्ह्यांमध्ये सध्या निर्बंध वाढवले जात आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता असून सध्याची रुग्णसंख्या ही देखील आटोक्याबाहेर असल्याने कोविड टास्क फोर्सने लॉकडाऊन ३० मे वाढवण्याचा सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गावागावांतील सौरऊर्जावरील पथदिवे निघाले भंगारात, प्रशासनाची उदासीनता आली समोर
- ‘काँग्रेसने देश निर्माण केलाय आणि मोदी आता स्वतःच घर उभं करतायत !’
- बंगालमध्ये नुकतेच विजयी झालेले भाजपाचे २ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

