Share

बेळगाव कुणाचं ? लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणीला सुरुवात

Published On: 

बेळगाव – बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अवघ्या 26 वर्षांचे शुभम शेळके मैदानात उतरले आहेत.

या निवडणुकीच्या रिंगणात दहा उमेदवार असले तरी खरी लढत भाजपच्या मंगला अंगडी आणि काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांच्यात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांची झेप कुठपर्यंत याचीही उत्सुकता आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली आहे, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे. त्यामुळे या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप असेही पाहिले जाते.

याशिवाय काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांच्यासह 10 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगावसह कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!