Share

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर, वाचा कोणाकोणाचा समावेश?

Published On: 

मुंबई :  भाजपसोबतची महायुती तोडल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. यामध्ये शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावल्यानंतर आता त्यांची शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर, त्यांच्यासोबत इतर १० जणांची देखील प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, राज्यसभा प्रियंका चतुर्वेदी, डॉ. नीलम गोऱ्हे, गुलाबराव पाटील, ऍड. अनिल परब, उदय सामंत,  सुनील प्रभू , प्रताप सरनाईक, किशोरी पेडणेकर यांचा समावेश आहे.

कोण आहेत हे प्रवक्ते?

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते

अरविंद सावंत – खासदार (मुंबई)

धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)

प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार

डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री

अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री

उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

सुनील प्रभू – आमदार (मुंबई)

प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)

किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)

महत्वाच्या बातम्या:-

‘पिंपरी-चिंचवड’चा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी अजित पवारांची नवी रणनीती?

तेलगू अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पत्रकारांच्या प्रश्नांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची बोलती बंद ?

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!