Share

गांधीनगर मनपा निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय

Published On: 

गुजरात : गुजरातमधील गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने चांगलेच यश मिळविले आहे. या निवडणुकीत भाजपाने ४४ पैकी ४१ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व दाखवून दिले. तसेच काँग्रेस व आम आदमी पार्टीला मात्र मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे.

या महापालिका निवडणुकीत ११ वॉर्डातील ४४ जागांसाठी एकूण १६२ उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. महापालिका निवडणुकीचे मतदान रविवारी पार पडल्यानंतर आज मतमोजणी झाली. यासंदर्भात बोलत असतांना भाजपा प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी म्हणाले की,’४४ पैकी ४१ जागांवर भाजपाला जनतेने विजयी केले आहे. यावरून हे दिसून येते की लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. तसेच, या निवडणुकीतून हे देखील स्पष्ट झाले की, गुजरातमध्ये तिसऱ्या पक्षासासाठी काही स्थान नाही.’

दरम्यान, निवडणुकीत आम आदमी पार्टीने ४० जागांवर उमेदवार उभा केले होते. तर, अन्य उमेदवारांमध्ये बसपाचे १४, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, अन्य पक्षांचे सहा आणि अपक्ष ११ उमेदवारांचा समावेश होता. जवळपास ५६.२४ टक्के मतदान झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!