Share

शिवसेनेचा बालेकिल्ला उध्वस्त करण्याची भाजपची तयारी; महाजनांवर पक्षाने दिली मोठी जबाबदारी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद:- येत्या काही दिवसांत राज्यातील 5 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी भाजपने हुकमी मोहरे निवडले आहेत.

नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकीमध्ये भाजपने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली. त्यानुसार आशिष शेलार यांना नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. तर गिरीश महाजन यांना औरंगाबादची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिंकण्याचं आव्हान महाजन यांच्यासमोर आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून अतुल सावे तर निवडणूक प्रभारी म्हणून गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणूक संघटनात्मक जवाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर असणार आहे.

दरम्यान, काँग्रेसने येथील निवडणुकीची सूत्रे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे दिली आहेत. काँग्रेस व शिवसेना यांच्यात सध्या औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याबाबत धुसफूस सुरु आहे. काँग्रेस आणि शिवसेनमधील वादाचा फायदा गिरीश महाजन घेवून भाजपला घवघवीत यश मिळून देतात का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!