मुंबई : ऊसतोड कामगारांसाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. पावसात कामगारांचे हाल होत आहेत. उद्याच्या उद्या त्यांची घरी जाण्याची सोय करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
‘कोरोना’च्या संकट काळातच कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना पावसाचाही फटका बसला. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर परजिल्ह्यात अडकले आहेत. अशातच पावसामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी उद्याच्या उद्या या मजुरांच्या घरी जाण्याची सोय करा, असं आवाहन ट्विटरवरुन केलं आहे.
‘इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली, धान्य भिजलय, आज अन्न गेलं नाही गळ्याखाली! बिचारे मजूर आयसोलेशनने आजारी पडतील. सर्व शिस्त पाळून, कष्ट करुन त्यांच्या ताटात माती? ते हॉट स्पॉटमध्ये नाहीत, न हॉट स्पॉटला जाणार आहेत. मग काय प्रॉब्लेम? उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!’ अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली,धान्य भिजलय,आज अन्न गेलं नाही गळ्याखाली!बिचारे मजूर Isolationने आजारी पडतील सर्व शिस्त पाळून,कष्ट करून त्यांच्या ताटात माती?ते हॉट स्पॉट मध्ये नाहीत न हॉट स्पॉट ला जाणार आहेत मग काय प्रॉब्लेम?उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!! pic.twitter.com/Is2bTxKnfv
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 16, 2020
राज्य शासनाचा दिलासा –
राज्य सरकारने आता ऊसतोडणी मजुरांना एक विशेष बाब म्हणुन काही अटींच्यावर आपल्या जिल्ह्यात परत जाण्याची परवागी देण्याच ठरवलं आहे . याबटची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ते ट्वीटरवर म्हणाले,
‘ऊसतोडणी मजुरांना एक विशेष बाब म्हणुन काही अटींच्यावर आपल्या जिल्ह्यात परतीचा प्रवास करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. गेले अनेक दिवस हि मागणी होती. ऊस तोडणी मजुरांची राज्यभरातील संख्या एक लाख पंचवीस हजारपेक्षा आहे. ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना परत पाठवण्यास सर्व साखर कारखाने सहकार्य करतील, अशी मला आशा आहे. ऊस तोडणी मजुरांना हवा असलेला निर्णय झाला याचा मला आनंद आहे.’



ऊसतोडणी मजुरांना एक विशेष बाब म्हणुन काही अटींच्यावर आपल्या जिल्ह्यात परतीचा प्रवास करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. गेले अनेक दिवस हि मागणी होती. ऊस तोडणी मजुरांची राज्यभरातील संख्या एक लाख पंचवीस हजारपेक्षा आहे. pic.twitter.com/91pFWeGqzx
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 17, 2020
ऊस तोडणी मजुरांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना परत पाठवण्यास सर्व साखर कारखाने सहकार्य करतील, अशी मला आशा आहे. ऊस तोडणी मजुरांना हवा असलेला निर्णय झाला याचा मला आनंद आहे.@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dhananjay_munde @Pankajamunde
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 17, 2020
पंकजा मुंढे यांनी मानले आभार –
राज्य सरकारने ऊसतोडणी मजुरांना एक विशेष बाब म्हणून आपल्या घरी जाण्याची परवागी दिल्या नंतर भाजप नेत्या पंकजा गोपीनाथ मुंढे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले आहे. त्या ट्वीटरवर म्हणाल्या,
सरकारचे आभार आमच्या गरीब कष्टकऱ्यांच्या वेदनेला विराम दिला त्या बद्दल आभार.. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्णयाबद्दल व मा. खा. शरद चंद्रजी पवार आणि ना. जयंत पाटीलजी आपण वेळोवळी चर्चा केली धन्यवाद आता कामगारांनी निश्चिन्त पणे नियमांचं पालन करून सुखरूप घरी जाव.’
सरकारचे आभार आमच्या गरीब कष्टकऱ्यांच्या वेदनेला विराम दिला त्या बद्दल आभार..माननीय मुख्यमंत्री @CMOMaharashtra निर्णयाबद्दल व मा. खा. शरद चंद्र जी पवार @PawarSpeaks आणि ना. जयंत पाटीलजी आपण वेळोवळी चर्चा केली धन्यवाद आता कामगारांनी निश्चिन्त पणे नियमांचं पालन करून सुखरूप घरी जाव.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 17, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

