Share

मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपाचे आज ‘दार उघड उद्धवा दार उघड’ घंटानाद आंदोलन

Published On: 

मुंबई : कोरोना रोगाच्या थैमानामुळे देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. यानंतर जून महिन्यात टाळेबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली गेली व त्यानंतर अनुक्रमे जुलै व ऑगस्टच्या सुरुवातीला जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आणखी शिथिलता आणली गेली. महाराष्ट्र राज्यात आता आंतरजिल्हाबंदी उठवण्यात आली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सुरु करण्यात आली आहे.

मात्र, कोरोना संसर्गाचा अजूनही असलेला धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रार्थनास्थळांवरील बंदी कायम ठेवली आहे. भाजप आध्यात्मिक सेलच्या माध्यमातून राज्यभरातील मंदिर प्रमुखांची मंगळवारी बैठक झाली. केंद्र सरकारने काही अटी शर्थीवर मंदिरे सुरू करण्याची परवानगी दिलेली असताना राज्यसरकार मात्र परवानगी देत नसल्याच्या विरोधात आज जन आंदोलन करण्यात येणार आहे.आज (दि. 29 ऑगस्ट) रोजी राज्यसरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिला होता.

तुकाराम मुंढेंच्या विरोधातील न्यायालयीन याचिका मागे घेणार का महापौर…?

त्यानुसार राज्यभरात आज हे आंदोलन करण्यात येणार आहे. मंदिर बंद असल्याने येथील अर्थकारण ठप्प झाले असून व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत राज्य सरकारकडे वारंवार मागणी केली, तरीही मंदिर सुरू करण्यास राज्य सरकार दिरंगाई का करते? दारूच्या दुकानापासून ते मॉल उघण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात. मग, मंदिरांबाबतच वेळ काढू पणाचे धोरण का? असा सवाल खा.सुजय विखे यांनी उपस्थित केला होता.

चंद्रपुरात ‘या’ टोळीचा उच्छाद… राज ठाकरे करणार वडेट्टीवारांना फोन

या आंदोलनाची सुरुवात बुलढाण्याच्या संग्रामपूरमधून सुरुवात करण्यात आली आहे. तर, पुण्यातील सारसबाग, इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील नृसिंह मंदिर, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, शिर्डीमधील साई मंदिर, पंढरपुरातील विठ्ठल मंदिर, नाशिकमध्ये रामकुंड यासह सर्वच जिल्ह्यातील विविध देवस्थानांबाहेर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी ‘स्वयंसेवक’ कसा ? नितीन राऊत यांचा प्रश्न

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!