Share

तुकाराम मुंढेंच्या विरोधातील न्यायालयीन याचिका मागे घेणार का महापौर…?

Published On: 

नागपूर : तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओपद बेकायदेशीरपणे बळकावले होते. त्यामुळे महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंढेंच्या अन्य ठिकाणांप्रमाणेच त्यांची येथील कारकीर्द वादळी पण तेवढीच वादग्रस्त ठरली आहे. शहरातच नव्हे राज्यभर या बदलीची चर्चा झाली. मुंढेंच्या बदलीच्या बदल्यात पालिकेतील सत्ताधारी न्यायालयातील याचिका मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत ‘तुकाराम मुंढे नागपुरात महापालिका आयुक्त म्हणून आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे’, असे नमूद करीत मुंढेंचे समर्थन केले होते. आता अचानक मुंढेंची बदली केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर तर घाणेरड्या राजकारणातून मुंढेची बदली झाल्याची टिका होत आहे. स्मार्ट सिटीतील गैरव्यवहाराबाबत सत्ताधाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याआधी पोलिसांतही तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने महापौर संदीप जोशी यांनी न्यायालयात धाव घेतली. यानंतर संपूर्ण राज्यात यावर जोरदार चर्चा झाली. हेच प्रकरण सत्ताधाऱ्यांना आयुक्त मुंढेच्या बदलीसाठी मोठे अस्त्र ठरल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर आयुक्त मुंढेंना स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून हटविण्यात आले.

स्मार्ट सिटीतील महिला अधिकाऱ्यांनी आयुक्त मुंडेंवर अपमानजनक वागणुकीचे आरोपच लावले नाही तर तक्रारही केली. यातूनच आयुक्तांनी बचावात्मक पवित्रा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विशेषतः न्यायालयीन कटकटीतून बाहेर काढण्याची विनंती केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दीड महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांविरुद्ध पायालयातील याचिका मागे घेण्याची तयारी दाखवली. पण त्यांची नागपुरातून बदली करण्याची अट ठेवल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मुंढे यांना मुख्यमंत्र्यांनीच नागपुरात पाठवले होते. त्यामुळे मुंढेंना या प्रकरणातून बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. अखेर मुंढे यांची बदली करून एकप्रकारे त्यांच्यामागील न्यायालयीन कटकटी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्याचे सूत्रांनी नमूद केले. त्यामुळे मनपातील सत्ताधाऱ्यांनी आयुक्त मुंढे यांच्याविरोधात स्मार्ट सिटी प्रकरणातील याचिका मागे घेतल्यास आश्चर्य वाटू नये, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

चंद्रपुरात ‘या’ टोळीचा उच्छाद… राज ठाकरे करणार वडेट्टीवारांना फोन

राष्ट्रीय महिला आयोगाकडे लक्ष स्मार्ट सिटीतील महिला अधिकाऱ्यांनी रजा नाकारणे, मानसिक त्रास देणे तसेच अपमानजनक वागणूक दिल्याबाबत त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगापुढे आयुक्त व महिला अधिकाऱ्यांची सुनावणीही झाली. महिला अधिकाऱ्यास आरोपाबाबतचे पुरावे सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले होते. अंतिम सुनावणीमध्ये महिला आयोग आयुक्तांबाबत राज्य सरकारला काय निर्देश देतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी ‘स्वयंसेवक’ कसा ? नितीन राऊत यांचा प्रश्न

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!