Share

भाजपचा ‘हा’ आमदार शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात नुसत्याचं चर्चा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात राजकीय अस्थिरता असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपचे नेते अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचे पोकळ दावे करत आहेत. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे अशी शंका व्यक्त करत असतानाचं भाजप आमदार जयकुमार गोरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.

पुण्यातील मोदीबाग येथील निवास्थानी जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. काही दिवसापूर्वी जयकुमार गोरे यांनी भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट का घेतली हे अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान भाजपचे काही आमदार आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. टीव्ही 9 मराठीशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचं म्हटलं होत. त्यानंतर लगेचचं माण – खटावचे आ. जयकुमार गोरे हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1195633185285013504?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195630192351277058?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195629574765236224?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!