🕒 1 min read
औरंगाबाद: भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. रविवारी तनवाणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत तनवाणी स्वगृही येत औरंगाबाद मध्य मधून निवडणूक लढविणार आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मधून तिकीट न मिळाल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आणि भाजपतर्फे मध्ये ची निवडणूक लढवली होती. या विधानसभेतही युती तुटेल याच आशेवर अश्विनी तनवाणी यांनी माध्यमातून तयारी केली होती.
आता युती होणार असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेवर आहेत त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारास इथून उमेदवारी दिली जाणार आहे. दरम्यान तनवाणी यांनी शिवसेनेचे जाण्याचीही तयारी दर्शवली आहे गेल्या महिन्यात ही तनवानी मुंबईला गेले असता मातोश्रीवर गेले याची चर्चा झाली होती. मात्र मी मुंबईत समाजाच्या कार्यक्रमासाठी गेल्याचे तनवाणी त्या वेळी स्पष्ट केले होते.
बारा नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते घेऊन ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान भाजप तर्फे गेल्या महिन्यात झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत तनवाणी यांनी मुलाखत दिली होती.
रविवारी शिवसेनेने स्टँडिंग आमदारांना एबी फॉर्म वाटप केले यामुळे तातडीने किशनचंद तनवाणी यांनी विमानाने जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत प्रवेशासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. युतीची घोषणा होतास प्रवेशासंदर्भात तनवानी निर्णय जाहीर करण्यात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिलीआहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178623511771791360?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178622945901469698?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178619577812447233?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
