Share

खा.ओमराजेंच्या गावात भाजपचा शिरकाव

Published On: 

उस्मानाबाद : शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे गाव असलेल्या गोवर्धनवाडीत 9 पैकी 6 जागांवर शिवसेनेने विजय मिळवलाय. तर भाजपने 3 जागांवर विजय प्राप्त केलाय. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर गोवर्धनवाडी हे गाव पूर्णपणे ओमराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. मात्र, आता राजकीय समीकरण बदलल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोवर्धनवाडीचा निकाल हा ओमराजे यांच्यासाठी आत्मचिंतनाचा विषय झाला आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील पळसप ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. पळसप हे विक्रम काळे यांचे मूळ गाव आहे. पळसपमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा सामना होता. पळसप ग्रामपंचायतीत एकूण 13 जागा आहेत. त्यातील 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या. 5 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामुळे पळसपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7, शिवसेनेला 5 आणि 1 अपक्ष उमेदवार निवडून आलाय. भाजपला मात्र इथे भोपळाही फोडता आला नाही.

कळंब तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायतीवर राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वातील पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. 7 जागांच्या या ग्रामपंचायतीवर 6 जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. तर एका जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय मिळाला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी चांगलाच जोर लावला होता. पण भाजपचे जिल्हाध्यक्ष नितील काळे यांच्या नेतृत्वातील भाजपच्या पॅनलचा विजय मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!