Share

राज्यातील फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

जळगाव:- विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव हा फाजिल नेतृत्वामुळे झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय. या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

अहम्-पणाचा पराभव झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही. पुणे आणि नागपूरसारखा परंपरागत मतदारसंघ भाजपच्या हातून गेला. लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढला आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!