अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक-५१६) चौपदरीकणासाठी श्रीगोंदा तालुक्यातील भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा ५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यातील बनप्रिंप्री, तरडगाव, मांडवगण व घोगरगाव या गावांतील जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक पी.बी.दिवाण यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरीता श्रीगोंदा तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. प्रांताधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे भारतीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यांना मंजुरी देऊन प्राधिकरणाने भूसंपादनापोटी ५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर केला आहे, असे खासदार विखे यांनी सांगितले.
कोरोनावर मात करून आमदार लहू कानडे यांची कामकाजाला सुरुवात
जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, म्हणून खासदार सुजय विखे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यापूर्वी कर्जत तालुक्यातील भूसंपादनासाठी 50 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे. आता श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून 50 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे खा.विखे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या ‘या’ दमदार आमदाराला कोरोनाचा विळखा ; अतिदक्षता विभागात उपचार सुरु


