अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी हिताच्या विधेयकाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलेली स्थगिती उठवण्यात यावी, या मागणीसाठी मा.आ.शिवाजी कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने दिलेली स्थगिती उठवण्यात यावी अन्यथा आगामी काळात मोठ्या वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिला आहे. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमतांनी मंजूर करून घेतले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यास मान्यता दिली आहे. ७० वर्षांनंतर दलालांच्या जोखडातून देशातील शेतकरी मुक्त झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे देशातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. असे असतांना राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडी सरकारने या निर्णयास स्थगिती दिली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी भयभीत झाला असून पुन्हा दलालांच्या जोखडात अडकण्याची भीती त्यास वाटत आहे. या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालाच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला आपल्या कष्टाने पिकविलेल्या शेतीमालाच्या विक्री व बाजारपेठेचे स्वातंत्र मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक देश एक बाजारपेठ असणार आहे. आपला शेतमाल शेतकऱ्यांना कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र मिळणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी हिताच्या विधेयकाला आघाडी सरकारने दिलेली स्थगिती उठवण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
सदर निर्णय तातडीने रद्द न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, रविंद्र म्हसे, शाहाजी जाधव, राजेंद्र गोपाळे, बाबासाहेब शिंदे, गणेश खैरे, यमनाथ भिंगारकर, विक्रम गाढे, मच्छिद्र गाढे, नारायण धोंगडे, संदिप गाडे, अरुण साळवे, अतिक बागवान, राजेंद्र उंडे, अशोक वराळे, सुभाष वराळे, अजित डावखर, नानासाहेब गागरे, सोपान गागरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य
- ‘आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्या उदयनराजेंना भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं’
- अमेरिकेतील उद्योजकांनी भारताकडे आपले पुढचे गुंतवणूक केंद्र म्हणून बघावे- पियुष गोयल
- भारतीय कापसासाठी ऐतिहासिक दिवस; भारतीय कापसाला प्रथमच ब्रँड आणि लोगो मिळाला
- आमचं सरकार ‘सर्वधर्मसमभाव’ मानणारं परंतु केंद्रातील तुमचं ‘आधळं, बहिरं आणि मुकं’ सरकार आहे – राष्ट्रवादी


