Share

भाजप नेत्यांसमोर उमेदवारीसाठी ३० लाखांचा चेक झळकवणारा ‘तो’ कार्यकर्ता आता सेनेत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागण्यासाठी भाजपच्या एका महाभाग कार्यकर्त्यानी तब्बल 30 लाखांचा चेक झळकवला होता. पण हि शक्कल लढवून देखील त्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळवण्यास अपयशच आले होते. आता हा महाभाग कार्यकर्ता सचिन चौगुले याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मिरजेत भाजपकडून काही दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. मुलाखती दरम्यान भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या सचिन चौगुलेने मुलाखत घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना थेट तीस लाखांचा चेक दाखवत उमेदवारीची मागणी केली होती.

पैसे असणारा उमेदवार हीच विजयाची क्षमता अशी भाजपाची मानसिकता असेल तर माझ्याकडे 30 लाख रुपये आहेत, असं खळबळजनक विधान करत मुलाखती चालू असतानाच त्याने चेक झळकवला होता.

भाजपच्या उमेदवारी प्रक्रियेवर शिवसेनेकडून वेळोवेळी प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असतात. मात्र आता उमेदवारीसाठी पैसे फेकणाऱ्या सचिन चौगुलेला पक्षात प्रवेश देल्याने शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शिवसेना पक्षाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय विभूते, शेखर माने अशा सांगलीतील नेत्यांचीही उपस्थिती होती.

महादेव जानकरांचे रावसाहेब दानवे यांच्या चरणी लोटांगण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!