मुंबई :मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात दररोज अनेक नवीन खुलासे उघडकीस येत आहेत. या दरम्यान प्रभाकर साईल यांचा व्हिडीओ आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. प्रभाकर साईल याच्या खळबळजनक दाव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. एनसीबीच्या धाडसत्राचे धागेदोरे मुंबईतच नव्हे, तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच आर्यन खान प्रकरणी एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात फरार किरण गोसावी, आर्यन खान आणि कथित सॅम डिसोजा दिसून येत आहेत. या व्हिडिओची सीबीआय चौकशीची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. यावर संजय राऊत यांनी भाजपवाल्यांनी जरुर याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
‘सीबीआय काय तुमच्या खिशात आहे का? तुम्हीही अनेक व्हिडिओ बाहेर आणले. पण आज तुमच्या काळजावर वार झाला म्हणून चौकशीची मागणी करताय का?, असा सवाल उपस्थित केला. तसंच मंत्री नवाब मलिक यांनी तर फक्त इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हलनंतरची खरी स्टोरी मी सांगणार आहे. येत्या काही दिवसांत असे १० व्हिडिओ मी देणार आहे. यात भाजपचे लोक कुठे-कुठे बसलेत ते सगळं समोर आणणार आहे’, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.
एनसीबीचं धाडसत्रं हे षडयंत्र आहे. पैशाचा खेळ आणि मनी लाँड्रिंग यात झालीय. त्यामुळे ईडीनं याची चौकशी करावी असं मी आता सांगणार आहे. मी ट्विट केलेल्या व्हिडिओत आत एनसीबीच्या कार्यालयात बसलेल्या त्या व्यक्ती कोण आहेत? आता हा खेळ सुरू झाला आहे. व्हिडिओत काळ्या कपड्यांमध्ये बसलेला व्यक्ती सॅम डिसोजा असून मनी लाँड्रिंग प्रकरणातील तो एक मोठा मोहरा आहे. अनेक मोठे अधिकारी, नेते यांचा पैसा परदेशात पाठवण्यात त्याचा हात आहे, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मलिकांकडून फक्त इंटरव्हलपर्यंतची कथा, त्याच्यानंतरची मी सांगणार’
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
- ‘मोदी सरकारने पीक विम्याचा हप्ता रोखला’, सचिन सावंत यांचा आरोप


