टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पुन्हा भाजप शिवसेना महायुतीचे सरकार येणार आहे. युतीला 200 पेक्षा जास्त मिळणार हे सांगायला कोणत्याही एक्झिट पोलची गरज नाही , असे म्हणत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी या विधानसभा निवडणुकीला शिवसेनेला १०० च्या वर जागा मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
यावेळी राऊत म्हणाले की, शिवसेनेने राज्यात १२४ उमेदवार उभे केले आहेत. सर्व उमेदवार हे जिंकण्यासाठीच उभे केले आहेत. त्यामुळे शिवसेनेला नक्कीच १०० पेक्षा जास्त जागा मिळणार. तसेच भाजपलाही या निवडणुकीत चांगले यश मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष पुन्हा राज्यात सत्ता स्थापन करणार आहेत. भाजपला जरी जास्त जागा मिळाल्या तरी शिवसेनेशिवाय भाजप काम करू शकणार नाही. त्यामुळे सत्ता युतीचीचं येणार आहे. असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. राज्यभरात एका टप्यात मतदान पार पाडले. काही ठिकाणी पावसाचे सावट असल्याने मतदानाचा टक्का काहीसा घसरताना दिसला. तर शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. येत्या 24 तारखेला म्हणजे उद्या मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे. हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1186906301680349186?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1186903964446363648?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

