🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार असून नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा 31 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे.भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकी नंतर सुधीर मुनंगटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, कोणी कितीही काही म्हणो राज्यात महायुतीच सरकार येणार आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या भाजपचे वरिष्ठ नेते उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळे उद्या राज्यपालांच्या भेटीमध्ये काय झाले हे सांगितले जाईल. तसेच लवकरच माध्यमांसाठी गुड न्यूज येईल, असे सूचक विधान सुधीर मुनंगटीवारांनी केले.
प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत अधिक माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर याबाबत निर्णय झाला असून यावेळी पक्षाध्यक्ष बदलला जातो. तसेच, 91 हजार बूथ अध्यक्षांचीही निवड होईल, भाजप जिल्हाध्यक्षांचीही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना का भेटणार यावरून मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज १३ दिवस झाले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यात कोणाचे सरकार येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता संघर्षाचे सत्र सुरु आहे. आज भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1192033293778112512?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192046542959415296?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192052071983267841?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1192052286815518720?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
