🕒 1 min read
नाशिक:- भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी समोर हजर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ईडीची नोटीस मिळाली असल्याचा खुलासा स्वतः एकनाथ खडसे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणातून खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ईडी मार्फत याच प्रकरणात खडसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे खडसे यांना खूप मोठा धक्का आहे, हे मात्र निश्चित आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. जो विरोधात बोलेल, त्याला ‘ईडी’च्या माध्यमातून त्रास देण्याचे षडयंत्र केंद्रातील भाजप सरकारकडून सुरू आहे. हे आता नवीन राहिलेले नाही. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले, त्याचवेळी ‘ईडी’च्या नोटिशीचा सासेमिरा मागे लागेल हे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे केंद्रीय आर्थिक महासंचालनालय अर्थात, ‘ईडी’ची टांगती तलवार त्यांच्यावर कायम राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया ED आणि सीबीआयलाच कोर्टात खेचण्याच्या तयारीत
- ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी अब्दुल सत्तारांच्या गावागावात बैठका सुरु
- यूपीएचा भाग नसल्यामुळे शिवसेनेने युपीएच्या अध्यक्ष पदाबाबत भाष्य करणे योग्य नाही : कॉंग्रेस
- यूपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये; अशोक चव्हाणांनी संजय राऊतांना फटकारले
- अखेर अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार, जानेवारीत आंदोलन करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
