मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्याचे त्यांनी जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात मान्य केल्यानंतर, उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक लक्ष्यवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
ईडी आणि सीबीआयचा सर्रास राजकारणासाठी वापर होत आहे असा आरोप सत्ताधारी करत आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ईडी (ED) आणि सीबीआयच्याविरोधात (CBI) न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.
TV9 मराठीने या संदर्भात वृत्त दिले आहे. या वृत्तात दमानिया म्हणाल्या,’खडसे यांना ईडीची नोटिस पाहता या सर्व गोष्टी फक्त राजकारणासाठीच होतात. मी २०१६ पासून लढत आहेत. आता ईडीला जाग आली का,’ असा सवाल त्यांनी केला. त्याच्याशी माझे काही देणे घेणे नाही, असे दमानिया यांनी आवर्जून नमूद केले आहे.
तिन्ही मोठे पक्ष, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी हे तिघेही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतात, आणि बदनाम आमच्यासारख्यांना करतात, जे भ्रष्टाचाराचा लढा देत आहेत, असं त्या म्हणाल्या.
‘आताच्या घटकाला एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाली आहे की नाही ते मला माहिती नाही. माझा लढा हा भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. एक याचिका ही मुंबई हायकोर्टामध्ये दाखल आहे. तर दुसरी याचिकाही भोसरी सेशन्स कोर्टामध्ये आहे. जर ईडीने या प्रकरणाची चौकशी केली आणि मला जबाब देण्यासाठी बोलावलं तर नक्की जाईल’ असंही दमानिया यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘नरेंद्र मोदींकडे 303 खासदारांचं बळ आहे त्यामुळेच ते कृषी कायदे मागे घेत नाहीत’
- ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी अब्दुल सत्तारांच्या गावागावात बैठका सुरु
- मोदी सरकारला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर
- नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज : अजित पवार
- अखेर अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार, जानेवारीत आंदोलन करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

