टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सदस्य नोंदणी मोहीम सुरु केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजप सदस्य नोंदणी मोहिम राबविण्यात आली.
आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत अबकी बर २२० के पार असा नारा भाजपने लगावला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील प्रत्येक मतदार संघात विकास रथयात्रा काढणार असल्याचे बोलले जात आहे.
याचदरम्यान भाजपतर्फे आज ( ६ जुलै ) पासून सदस्य नोंदणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. ही सदस्य नोंदणी ११ ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही आज परळी शहरात व ग्रामीण भागात पांगरी कॅम्प येथे सदस्य मोहिमेचा शुभारंभ केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

