टीम महाराष्ट्र देशा : सत्तेत भाजपानं सगळी मंत्रिपदं घ्या पण मुख्यमंत्रीपद शिवसेनेचंच असेल. अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १२ दिवस उलटूनही राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटायचे अजूनही कायम आहे. त्यातच अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा या फॉर्म्युलासाठी शिवसेना आग्रही आहे.
त्यातच संजय राऊत दररोज शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून आणि पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला करत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. ”भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद, ८ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्रीपदांचा प्रस्ताव दिला आहे. या प्रश्नावर राऊत यांनी, भाजपने सगळी मंत्रीपदं घ्यावी, पण मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यावं, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ते म्हणाले, ”मुद्दा हा खात्यांचा नसून मुख्यमंत्रिपदाचा आहे. शिवसेनेला मलईदार खाती पाहिजेत, असं बोललं जातं, पण आम्ही प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली मध्यमवर्गीय माणसं आहोत. आम्ही आमदार, खासदार, मंत्री होऊ, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते रस्त्यावरच काम करणार, असं राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी गेल्या पाच वर्षांत सुडाचं राजकारण केल्याची टीकाही केली. ”माणूस जेव्हा मोठा असतो, लोकनेता असतो तेव्हा तो अशाप्रकारे यंत्रणा वापरून काम करत नाही. कमकुवत आणि कुवत नसलेलं नेतृत्व असतं त्यांना या उलाढाली आणि उचापती कराव्या लागतात, अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1191351330784235520?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191351480931905536?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

