Share

वाचा भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत कसोटी मालिका आणि टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिका (SA vs IND) दौऱ्यावर गेला आहे. दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. कोरोना व्हायरसमुळे हा दौरा कमी करण्यात आला आहे.

यापूर्वी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 मालिकाही खेळायची होती. त्यानंतर दोन्ही मंडळांनी ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा भारतीय संघात कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होणार नाही. दुखापतीमुळे त्याला बाहेर राहावे लागले आहे. त्याला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले मात्र नंतर ही जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे.

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार असून पहिला कसोटी सामना बॉक्सिंग डे कसोटी असेल. वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर भारतीय संघाचे आव्हानही मोठे असणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

२६ डिसेंबर, पहिला कसोटी सामना (सेंच्युरियन)

३ जानेवारी, दुसरा कसोटी सामना (जोहान्सबर्ग)

11 जानेवारी, तिसरा कसोटी सामना (केपटाऊन)

जानेवारी १९, पहिला एकदिवसीय (पार्ल)

21 जानेवारी, दुसरी वनडे (पार्ल)

२३ जानेवारी, तिसरी एकदिवसीय (केप टाऊन)

भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत आहे. हनुमा विहारी संघात परतला आहे. त्याच्याशिवाय प्रियांक पांचालचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पांचाल नुकताच दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध खेळला आहे. दुखापतीनंतर रोहित शर्माच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच केएल राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!