जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात नगर पंचायत निवडणुकीवरुन चांगलाच कलगीतूरा रंगला आहे. गुलाबराव पाटील यांनी मतदार संघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे चकचकीत केल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर नाथाभाऊंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पहायचं वाकून’, अशा शब्दात नाथाभाऊंनी गुलबराव पाटलांवर निशाना साधला.
जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आले आहेत. यात विकास कामांवरुन या दोन पक्षात चांगलीच जुंपली आहे. गुलाबराव पाटील यांनी बोदवडच्या प्रचार सभेत बोलताना रस्ते हेमा मालिनीच्या गालांसारखे चकचकीत केले आहे, असे म्हणत एकनाथ खडसेंना डिवचलं होतं. त्यावर एकनाथ खडसेंनीही गुलाबराव पाटलांना उत्तर दिले.
एकनाथ खडसे म्हणाले, गुलाबराव पाटील यांना नाथाभाऊंनी तीस वर्षात काय केलं हे माहिती आहे. जिल्ह्यातील लोकांना नाथाभाऊनं काय केलं हे माहिती आहे. हेमा मालिनी त्यांना का आठवली हे माझ्या लक्षातं नाही आलं. ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील. मी त्याची फार दखल घेत नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले.
ज्या वेळेस तीस वर्ष एखाद्या लोकप्रतिनिधीला लोक निवडून देतात त्यावेळी त्यानं काम केल्याशिवाय देत नाहीत. मला राजकारणात चाळीस वर्ष झाली आहेत. मी चाळीस वर्षात एकही निवडणूक हारलेलो नाही. जळगावच्या विकासकामामध्ये सर्वाधिक काम मी केलं आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ”दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय?”; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका
- ‘भाजपावाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार आता घालवाच!’
- शिवरायांचा अपमान ही किरकोळ किंवा छोटी घटना असेल तर मोठे काय? शिवसेनेचा सवाल
- ”जयंतराव, हा शहाणपणा राजू नवघरे आणि नवाब मलिकांना सांगा”
- …पण ह्या राष्ट्रवादी आमदार राजू नवघरेचं काय करायचं? नितेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
