टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार नसताना प्रचार करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांच्या खर्चाचा तपशील देण्याबाबत ही नोटीस आहे.
भाजपने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस बजावली आहे. ‘मनसेने लोकशाहीप्रमाणे आपलं काम करावं’ असं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. याला मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे. “मनसेने ज्या प्रचारसभा घेतल्या आहेत, त्याचा सविस्तर खर्च आमच्याकडे आहे. आम्ही तो आमच्या पक्षाच्या खात्यातून केला असून, जेव्हा कुणी आम्हाला खर्च मागेल, तेव्हा आम्ही तो देऊ. मात्र अजून तरी निवडणूक आयोगाने आम्हाला अशी कोणतीही नोटीस दिलेली नाही”, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी “आशिष शेलार कोण आहेत, त्यांनी आमच्या आणि निवडणूक आयोगामध्ये चोमडेपणा करु नये, भाजपनं आम्हाला लोकशाही शिकवू नये, मुळात निकाल लागल्यानंतर ९० दिवसाच्या आत खर्च देण्याची मुदत आहे” अशा शब्दात देशपांडे यांनी आशिष शेलार आणि भाजपवर तोंडसुख घेतले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
