Share

ब्रेकिंग : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेना एनडीएतून बाहेर, भाजपची घोषणा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सत्ता संघर्ष शिगेला पोहचल्याने भाजप शिवसेनेच्या संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम दिल्लीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात होणार असल्याचं दिसत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. याआधी रविवारी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा भाजपने केली आहे. त्यामुळे आता सेनेचे खासदार आता विरोधी बाकावर बसणार आहेत.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. शिवसेनेच्या मंत्र्यांने राजीनामा दिला आहे. एनडीएच्या ते बैठकीलाही आले नाहीत. त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे. अशी माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी भाजपने शिवसेनेला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रणच दिलेलं नाही, त्यामुळे जाणार नाही अस सांगितले होते. राज्यसभेत सेना खासदारांची बैठक व्यवस्था बदलली जात असल्याचंही माझ्या कानावर आलं असल्याचं राऊत म्हणाले होते. त्यामुळे, आता शिवसेनेच्या विरोधाची झलक देशाच्या संसदेतही दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हिवाळी अधिवेशनासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या घटकपक्षांची बैठक रविवारी बोलावण्यात आली होती. मात्र राज्यात सत्तास्थापनेवरून झालेल्या वादानंतर शिवसेना भाजपापासून दुरावली आहे. त्यामुळे संबंध बिघडल्यानंतर शिवसेनेला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आलं नव्हत. त्यामुळे भाजप शिवसेनेची युती आता तुटल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195992388306493440?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195989989810556929?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195989450246897664?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!