Share

बंडोबांना शमविण्यासाठी दोन्ही पक्षाचे प्रयत्न; बैठका मागून बैठका सुरु

Published On: 

औरंगाबाद : जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवारा विरोधात भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज सादर केले आहे. या बंडोबा महायुतीतील अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी ठरत आहे. यांचा शांत करण्यासाठी रविवारी दोन्ही पक्षांची सकाळी व संध्याकाळी दोन्ही पक्षाच्या नेेत्याची झाली. यात काहींनी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजप-शिवसेनेतर्फे राज्यातील 288 जागांवर स्वतंत्रपणे तयारी केली होती. युती तुटेल याच आशेने अनेकांनी तयारी केली होती. जिल्ह्यातील 9 मतदारसंघातही अनेकांनी तयारी केली होती. युती झाल्यामूळे जिल्ह्यातील औरंगाबाद मध्य, पश्‍चिम, सिल्लोड, कन्नड, पैठण आणि वैजापूर हे मतदारसंघ शिवसेनेला सुटेले आहे. तर औरंगाबाद पुर्व, फुलंब्री आणि गंगापूर हे तीन मतदारसंघ भाजपला सुटले आहेत. भाजपच्या पुर्व आणि फुलंब्रीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंड करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तर शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ते पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी शमविण्यासाठी दोन्ही पक्षातर्फे वरिष्ठांना मोठी मेहनत घ्यावी लागली.

याच संदर्भात भाजपच्या जिल्हा कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार संजय सिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले तर भाजपतर्फे प्रदेश प्रवक्‍ते शिरिष बोराळकर आणि मराठवाडा संघटक भाऊराव देशमूख यांच्यात बैठक झाली. या बैठकीत दोन्ही पक्षातील बंडखोरांची यादी एकमेकांसमोर ठेवण्यात आली. यात माघारी घेण्याविषयी बरीच चर्चा झाली. या बैठकीनंतर आता भाजप स्वतंत्रपणे बंडखोरी केलेल्यांची चार वाजता बैठक घेणार आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत कोण कोण रिंगणात राहणार याची चित्र स्पष्ट होईल.

यांनी केली बंडखोर

मतदारसंघ———–अधिकृत उमेदवार——- बंडखोर
औरंगाबाद पुर्व——— अतुल सावे———- रेणुकादास वैद्य (शिवसेना)
औरंगाबाद मध्य ——प्रदीप जैस्वाल———-किशनंचद तनवाणी (भाजप)
औरंगाबाद पश्‍चिम—-संजय सिरसाट——— राजू शिंदे व बाळासाहेब गायकवाड (भाजप)
फुलंब्री————-हरिभाऊ बागडे———-रमेश पवार(शिवसेना)
सिल्लोड———–अब्दुल सत्तार———- सुरेश बनकर व सुनील मिरकर(भाजप)
पैठण————संदीपान भूमरे————-कल्याण गायकवाड व कांचन चाटे (भाजप)
कन्नड——— उदयसिंग राजपूत———–किशोर पवार, राजू राठोड आणि संजय गव्हाणे(भाजप)
वैजापूर———रमेश बोरनारे————-एकनाथ जाधव व डॉ. दिनेश परदेशी (भाजप)

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181085626621292544?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181082389964943361?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181078754992328705?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!