Share

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं पाप भाजप – शिवसेना करत आहेत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ”महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही जो राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे तो योग्य नाही. स्पष्ट बहुमतानंतरही भाजपा आणि शिवसेना राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं पाप भाजपा आणि शिवसेना करत आहेत.” अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील शेतकरी संकटात असताना, अशी अस्थिरता कायम राहणे योग्य ठरणार नाही, अशी काळजीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, विधिमंडळाची मुदत संपायला काही तास शिल्लक असताना राज्यात सरकार स्थापनेचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. भाजपा आणि शिवसेना आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल हा प्रश्न जनतेला भेसवत आहे. राज्यात निर्माण झालेल्या राजकीय संघर्षावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. भाजपा आणि शिवसेना राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटत आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता फेटाळून लावली. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे. काल शरद पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहोत. असे स्पष्ट्करण त्यांनी यावेळी दिले.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1192389469556490242?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192423000898826240?s=20

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!