Share

युती झाल्यास भाजपचे काही इच्छुक बंडखोरीच्या तयारीत

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीची बोलणी सुरू आहे घटस्थापनेच्या मुहूर्तावर युतीची घोषणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. असे असले तरी भाजप व शिवसेनातर्फे 288 स्वतंत्र तयारी करण्यात आली आहे. युती झाल्यास औरंगाबाद जिल्ह्यात काही जागांवर भाजपच्या इच्छुकांनातर्फे बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

भाजपतर्फे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील 9 मतदार संघासाठी भाजप इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यात युतीमधील शिवसेनेच्या जागांसाठी ही भाजपच्या इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या.

त्या औरंगाबाद पश्चिम मधून राजू शिंदे ,बाळासाहेब गायकवाड, चंद्रकांत हिवराळे, जालिंदर शेंडगे यांनी मुलाखती दिल्या होत्या. पश्चिम हा मतदारसंघ शिवसेनेच्या या वाटेवर आहेत विद्यमान आमदार संजय शिरसाठ या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहे. त्यामुळे मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. युती झाल्यावर हा मतदारसंघातून सेनेचा उमेदवार असेल तर भाजपतर्फे राजू शिंदे बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

यासह औरंगाबाद मध्य मतदारसंघ ही शिवसेनेच्या वाटेवर आहे. या मतदारसंघात 2014 मध्ये युती तुटल्यामुळे भाजप-शिवसेना स्वतंत्र उमेदवार उभा होता ह्या भाजप-शिवसेनेच्या लढतीत एमआयएम ने बाजी मारली होती. या मतदारसंघातून ही भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे.

तसेच जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघ युतीमध्ये भाजपच्या वाटेवर आहे . काँग्रेसमध्ये बंडखोरी करणारे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सिल्लोडच्या जागेवर शिवसेनेचा दावा केला जात आहे. सिल्लोड ची जागा शिवसेनेला मिळाल्यास तेथे भाजपचे सुरेश बनकर ,इद्रिस मुलतानी यासह अन्य लोक बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे.

वैजापूर मतदार संघात विद्यमान जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव इच्छुक आहे मात्र हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेवर येत असल्यामुळे त्यांच्याही बंडखोरीच्या हालचाली दिसून येत आहेत.
कन्नड मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेवर आहे मात्र येथून भाजपच्या तर्फे ही तयारी करण्यात आली आहे येथेही बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178246744284381186?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178246942108708864?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!