🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बंड केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ आमदारच नाही तर शिवसेनेच्या कोट्यातील जवळपास सर्वच मंत्रीही आहेत. उद्धव ठाकरेंना रोजच धक्का बसतोय. एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. या सर्व घडामोडींवर बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर म्हणाले कि, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरेच असून कोणीही मातोश्रीवर आरोप करु नयेत. महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार आहे. आम्हाला उद्धव ठाकरेंबाबत नितांत आदर आहे. आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आणि आदर आहे. जनमताच्या कौलाप्रमाण राज्य युती सरकार हवं होतं, पण तसं झालं नाही, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, आमदारांचा माझ्यावर दबाव आहे कि आपण भाजपसोबत गेलं पाहिजे. असे कोण आमदार आहेत घेऊन या माझ्याकडे. बघू आपण मला पटलं आणि सगळ्या सैनिकांची इच्छा असेल तर चला भाजप सोबत. पण जो भाजप आपल्याशी विश्वास घातकीपणाने वागला आहे. २०१४ साली युती तोडली. २०१९ ला आपल्या विरोधात बंडखोर उभे केले. आपल्याला दिलेली वचनं त्यांनी नाकारली. त्याच भाजपसोबत जायचं असेल तर एक गोष्ट पाहिजे. भाजपकडून योग्य प्रपोजल आलं पाहिजे. ते सर्व शिवसैनिकांना मान्य पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
