टीम महाराष्ट्र देशा : अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघामध्ये ‘रोड शो’ करीत असताना एका युवकाने जीपवर चढून केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली होती. केजरीवाल यांचे नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील वक्तव्य सहन न झाल्याने त्या व्यक्तीने केजरीवाल यांच्यावर हल्ला केला असल्याची चर्चा आहे.
आज अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी सुरक्षेतील निष्काळजीपणाला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार धरले असून आम आदमी पार्टी संपविण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. गेल्या पाच वर्षात नऊवेळा हल्ले झाले आहे. हे हल्ले माझ्यावर नसून दिल्लीत जनतेवर झाले आहेत. जनतेने निवडणूक दिलेल्या मुख्यमंत्र्यावर झाले आहेत. तसेच, दिल्लीतील जनता याचा बदला नक्की घेईल. असे हल्ले केल्याने आमचा आवाज बंद होणार नाही किंवा आमचे धाडस संपणार नाही, अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर टीका केली.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटकदेखील करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

