आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा शनिवारी कार्यकर्त्यांसह (२३ एप्रिल) मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. दरम्यान शिवसेना आक्रमक झाली आहे. राणा कुटुंबाने मोतोश्रीवर येऊन दाखवावे, आम्ही त्यांचा चांगला पावनचार करु, असे आव्हान शिवसेनेने केले आहे.
यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना, राणा कुटुंबासह राज ठाकरे आणि किरीट सोमय्या यांच्यावर तिखट शब्दात निशाणा साधला आहे.