🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ”नागरिकत्व सुधारणा विधेयक देशहिताचे असे असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देशहितासाठी हे विधेयक स्वीकारने आवश्यक आहे. शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखवावा, कोणाला घाबरू नये. सरकार वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार असल्याच सूचक विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ”नागरिकत्व सुधारणा विधेयक देशहिताचे आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देशहितासाठी हे विधेयक स्वीकारावं, हे विधेयक देशासाठी आवश्यक आहे. शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखवावा, कोणाला घाबरू नये. ते पुढे म्हणाले, ” लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं शिवसेनेने समर्थन केले पण राज्यसभेत पळ काढला. सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका. नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी देशासाठी आवश्यक आहे. घुसखोरांना घालवलंच पाहिजे.”
त्याचप्रमाणे, कॉंग्रेसच देशात भारत बचाव आंदोलनावर टीका करताना भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकी आहे. सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हता, राष्ट्र सर्वप्रथम हा भाजपचा अजेंडा असल्याचा टोला आशिष शेलार यांनी काँग्रेसला लगावला. तर काँग्रेसला त्यांची मतपेटी सांभाळायची आहे म्हणून घुसखोर पाकिस्तानी, बांगलादेशींना बाहेर काढण्यास विरोध करीत आहेत ! असे म्हणत त्यांनी महाराष्ट्र धर्माचे रक्षण करा, घुसखोर पाकिस्तानी, बांगलादेशींना काढून निर्वासित बौद्ध,जैन,ख्रिश्चन,हिंदूचे संरक्षण करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1205776611645087745?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205778230986194944?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
