टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. लॉक डाऊन केले असले तरी राज्यात कोरोनाच्या केसेस मुख्यत्वेकरून मुंबई आणि पुण्यात वेगाने वाढत आहे याच मुद्यावरून राज्य सरकार हे विरोधकांच्या लक्ष होत आहेत.
आता भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीटरवरून महाविकासा आघाडी सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी लॉक डाऊन उठवून ऊद्योग सुरू झाले पाहिजे नाही तर अर्थ संकट मोठं असेल असही सुचवलं आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांत समाज माध्यम आणि वृत्त माध्यमांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक होत आहे. परंतु निलेश राणे यांनी यावरूम माध्यमांवर टीका केली आहे तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली आहे.
काय म्हणाले निलेश राणे –
आपल्या देशात पण लवकरात लवकर सगळे उद्योग सुरू झाले पाहिजे नाही तर अर्थ संकट हे कोरोना व्हायरस पेक्षा मोठ संकट होईल. एक म्हण आहे, सगळी सोंग करता येतात पण पैश्याचा सोंग करता येत नाही.
ह्या सरकार मध्ये ठेकेदार कचरा विकून श्रीमंत होतायत. त्यांना कोणाची भीती वाटत नाही कारण त्यांना माहीत आहे कार्यवाही झाली तरी पैसे देऊन सुटू शकतो. ठाकरे नाही ठेकेदार सरकार आलंय.
कोण आला रे कोण आला PR टीमचा वाघ आला. मुख्यमंत्र्याच्या PR टीमचं अभिनंदन, खूप मेहनत घेतातय आपण. महाराष्ट्र असाच तुम्ही चालवला तर लवकरच लोकं चपलेने आभार मानतील तुमचे.
आपल्या देशात पण लवकरात लवकर सगळे उद्योग सुरू झाले पाहिजे नाही तर अर्थ संकट हे कोरोना व्हायरस पेक्षा मोठ संकट होईल. एक म्हण आहे, सगळी सोंग करता येतात पण पैश्याचा सोंग करता येत नाही. https://t.co/5o8ZFnLLPJ
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 22, 2020
ह्या सरकार मध्ये ठेकेदार कचरा विकून श्रीमंत होतायत. त्यांना कोणाची भीती वाटत नाही कारण त्यांना माहीत आहे कार्यवाही झाली तरी पैसे देऊन सुटू शकतो. ठाकरे नाही ठेकेदार सरकार आलंय. pic.twitter.com/QxF4B2qBlg
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 22, 2020
कोण आला रे कोण आला PR टीमचा वाघ आला. मुख्यमंत्र्याच्या PR टीमचं अभिनंदन, खूप मेहनत घेतातय आपण. महाराष्ट्र असाच तुम्ही चालवला तर लवकरच लोकं चपलेने आभार मानतील तुमचे. https://t.co/CWKlD063qM
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 22, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

