Share

राज्यातले भिन्न विचारांचे सरकार अवघ्या सहा महिन्यात कोसळेल : नारायण राणे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रशासनाची कोणतीही जाण नाही. राज्याच्या व जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत, असे म्हणत भाजप खा. नारायण राणे यांनी महाविकासआघाडीचे सरकार सहा महिन्यात कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

सावंतवाडी येथील पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांना प्रशासनाची कोणतीही जाण नाही. राज्याच्या व जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत व विकासाला खीळ बसेल. सत्तेत असलेले तीन पक्ष वेगवेगळ्या विचारांचे आहेत.

हिंदुत्ववादी व धर्मनिरपेक्ष अशा वेगवेगळ्या विचारधारा असणारे हे तिन्ही पक्ष असल्यामुळे त्यांचे परस्परांशी जास्त काळ पटणार नाही. तीन पक्ष जास्त काळ एकत्र राहू शकणार नाहीत आणि हे सरकार सहा महिन्यांत कोसळेल, असे राणे म्हणाले.

तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: कोणतेही पद कधी घेतले नाही. त्यांनी नेहमी शिवसैनिकांना पदे दिली. उद्धव ठाकरेंनाही सुरुवातीला तेच दाखवायचे होते. मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार, असे ते वारंवार सांगत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत उद्धव यांचे नाव पुढे केले गेले. तसे सुचवायला पवारांना भाग पाडले गेले, असेही राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1206801387545194496?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206797597161082882?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206795920194428928?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!