🕒 1 min read
नवी दिल्ली- माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचं आज निधन झालं असताना भाजपसाठी आणखी एक दुखद बातमी समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील आरएमएल रुग्णालयाजवळ खासदारांचे घर आहे. 62 वर्षीय भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचा मृतदेह त्याच निवासस्थानी लटकलेला आढळला. सध्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.त्यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर भाजपच्या संसदीय मंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार त्यांना सकाळी 8.30 च्या सुमारास माहिती मिळाली की भाजपा खासदार रामस्वरूप शर्मा यांनी आरएमएल रुग्णालयाजवळील गोमती अपार्टमेंटमध्ये (एमपी फ्लॅट) आत्महत्या केली. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा खासदार यांचा मृतदेह लटकलेला आढळला. अद्याप आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
भाजपा खासदार रामस्वरूप शर्मा यांच्या स्टाफने दिल्ली पोलिसांना सांगितले की, ‘जेव्हा आम्ही आज सकाळी खोली उघडण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्याला आतून कुलूप लावले होते, वारंवार फोन करूनही खोली उघडली नव्हती, तेव्हा पोलिसांना बोलविण्यात आले. जेव्हा पोलिस आले तेव्हा दरवाजा तोडण्यात आला. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील जोगिंदरनगरचे रामस्वरूप शर्मा रहिवाशी होते. ते सलग दुसऱ्यांदा खासदार झाले होते.तत्पूर्वी ते बराच काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कार्य करत होते. खासदार होण्यापूर्वी ते मंडी जिल्ह्याचे भाजप सचिव आणि त्यानंतर हिमाचल प्रदेश भाजपाचे सचिव होते. ते हिमाचल अन्न व नागरी पुरवठा महामंडळाचे अध्यक्षही राहिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हाधिकारी चव्हाण यांचा ग्रामीण भागातही दणका
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- वर्षावर बैठकांचे सत्र सुरूच, अजित पवार पोहचले मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- राज्यात 18 ते 20 मार्च दरम्यान पावसाची शक्यता, जाणून घ्या कुठे पडू शकतो पाऊस?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
