Share

फ्रीडम हाऊस’च्या अहवालावर भाजप खासदाराची टीका !

Published On: 

नवी दिल्ली: जगभरातील देशांमध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्याचे मुल्यांकन करणारी संस्था फ्रीडम हाऊस हिने नुकताच एक अहवाल सादर केला यामध्ये त्यांनी भारताचे मानांकन घसरल्याच नमूद केल आहे.

नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून भारताचं स्वातंत्र्य नष्ट होत असल्याचं फ्रीडम हाऊसने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे मानांकन 71 वरून घसरुन 67 करण्यात आले आहे. जागतिक पातळीवरील 211 देशांपैकी भारताचा क्रमांक 88 वा लागतो. यापूर्वी भारत 83 व्या क्रमांकावर होता.

फ्रीडम हाऊस दरवेळी आपल्या अहवालात काश्मीरचा उल्लेख भारतापेक्षा वेगळा करते. यावेळी काश्मीरला स्वातंत्र्यच नाही असं त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे भारत पूर्णतः स्वतंत्र देशावरून आता भारत अंशतः स्वतंत्र देशावर खाली आला आहे. 2013 ते 2019 या काळात काश्मीर हा भाग अंशतः स्वतंत्र या प्रवर्गात येत होता. देशद्रोहाच्या कायद्याचा वापर, मुस्लिम अत्याचार आणि कोरोनासारखी परिस्थिती हाताळताना उचललेले पाऊल या पार्श्वभूमीवर भारताचे मानांकन कमी करण्यात आल्याचं फ्रीडम हाऊसच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, भाजपच्या खासदाराने हे निष्कर्ष फेटाळून लावले आहेत. भारतविरोधी कटाचाच ‘फ्रीडम हाऊस’चा अहवाल भाग असल्याचा दावा भाजप खासदार प्रा. राकेश सिन्हा यांनी केला आहे. पश्चिमेकडील (अमेरिका) एक शक्ती भारताची स्वतःच्या नजरेतून मांडणी करत असल्यामुळेच हा अहवाल पूर्णपणे भारतविरोधी कटाचा भाग आहे. त्यांची दृष्टी किती दूषित आहे, हे यातून दिसते. भारतात दररोज शेकडो टीव्ही चॅनेल स्वतंत्रपणे वादविवाद, चर्चो होते. वृत्तपत्रांवर कोणतेही नियंत्रण नाही. सोशल मीडियालाही पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. मग हे स्वातंत्र्य नाही, तर आणखी काय आहे?, असा सवालही सिन्हा यांनी ‘फ्रीडम हाऊस’च्या अहवालावर टीका करताना उपस्थित केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!