Share

ओबीसी आरक्षणावर निवडणुकीच्या संदर्भात फार मोठं प्रश्नचिन्ह – देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : काल सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो निर्णय दिला त्यातील ओबीसी आरक्षणावर निवडणुकीच्या संदर्भात एक फार मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे, सहा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे या निवडणुका पुन्हा होणार आहेत. आताच्या सात हजार ग्रामपंचायती झाल्या त्याला देखील हा निर्णय लागू होणार आहे एक मोठी अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे यापूर्वी आमचे सरकार असताना आम्ही यावर तयारी केली होती. अस विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले आहेत.

सरकारने प्रचंड दुर्लक्ष केले आहे सरकारच्या अनेक मंत्री ओबीसींच्या मोर्चात दिसतात मात्र इतकी मोठी केस कोर्टात सुरू असताना इतका मोठा निकाल असताना सरकार दुर्लक्ष करत आहे. या निकालावर पुढील कायदेशीर कारवाई राज्य सरकारने करावी या प्रकरणी सरकार मागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत मात्र सरकार असे दुर्लक्ष करणार असेल तर हा प्रश्न आमी लावून धरू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दुसरीकडे सभागृहाबाहेर भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. तामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडली, पण त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मराठा आरक्षणावरच स्थिगिती का आहे? मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असं सांगतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर परिणामांना समोरे जा, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!